04 March 2021

News Flash

Sex Racket: मुंबईत मॉडेल्सना वेश्याव्यवसायात ओढणारे दलाल गजाआड

पोलिसांनी तीन अभिनेत्रींची सुटका केली आहे.

मोठ्या कार्यक्रमात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून अभिनेत्री-मॉडेल्स यांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने पकडले. अभिनेत्रींना फसवून या व्यवसायात ढकलणारी एक साखळीच उघडकीस आली असून, कबीर नावाची एक व्यक्ती यामागे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. पोलिसांनी तीन अभिनेत्रींची सुटका केली आहे.
हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना चांगल्या कार्यक्रमांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष कबीर नावाची व्यक्ती दाखवत होता. या अभिनेत्रींची छायाचित्रे घेऊन ती ग्राहकांना पुरवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार सोमवार, ६ जून रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास गोरेगावच्या ओबेरॉय मॉलसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावेळी दोन दलाल तीन मुलींना घेऊन तिथे पोहोचले. पैशांची देवाणघेवाण झाल्यावर पोलिसांनी छापा मारत दोन्ही दलालांना पकडले. दलालांमध्ये एक महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. चौकशीत कबीर नावाच्या व्यक्तीसाठी काम करत असल्याचे या दलालांना सांगितले. पाच हजार रुपयांना या तरुणींचा सौदा केला जात होता. समाजसेवा शाखेने या दलालांना दिंडोशी पोलिसांच्या हवाली केले असून, कबीर नावाची व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:24 pm

Web Title: two agents arrested in mumbai in sex racket issue
टॅग : Sex Racket
Next Stories
1 Illegal construction: दिघ्यातील बेकायदा घरे रिकामी करण्यासाठी मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार
2 Raj Thackeray: राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय चर्चा झाल्याची माहिती
3 घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली; पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहनांचे नुकसान
Just Now!
X