01 December 2020

News Flash

पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

कामावर तैनात असणाऱ्या पोलीस हवालदाराला मारहाण करणाऱ्या दोन भावांना जे. जे. मार्ग पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली.

| September 7, 2013 05:31 am

कामावर तैनात असणाऱ्या पोलीस हवालदाराला मारहाण करणाऱ्या दोन भावांना जे. जे. मार्ग पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. वाहतूक कोंडी सोडवत असताना झालेल्या वादातून या दोघांनी पोलीस हवालदार अरविंद केणी यांना मारहाण केली होती.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पायधुणी येथील नळबाजारात वाहतूक कोंडी झाली होती. जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार केणी वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी या परिसरात राहणारे मुज्जफ्फर पटेल (३२) आणि फैजल पटेल (३५) हे दोघे त्यांच्याशी वाद घालू लागले. त्या वादानंतर त्यांनी केणी यांना भररस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली.
केणी यांच्या मदतीला दुसरा पोलीस हवालदार धावून आला आणि त्यांनी दोन्ही आरोपींना पकडले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  
दरम्यान, जखमी झालेल्या केणी यांच्यावर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 5:31 am

Web Title: two arrested beating cops
Next Stories
1 ‘ग्लास हाऊस’ला पुन्हा दणका
2 रुग्णालयांचा ‘नफा तोटा’ तपासण्याचे आदेश
3 शहापुरात दलित तरुणीचा संशयास्पद मृत्यू
Just Now!
X