दोन परदेशी विद्यार्थीनीची सुटका; पश्चिम उपनगरातील चौथी कारवाई

मुंबई : हिंदी चित्रपट, जाहिरातींमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तुर्कमेनीस्तान येथून शिक्षणासाठी भारतात आलेल्या दोन तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दुकलीला समाजसेवा शाखेने बेडय़ा ठोकल्या. नावेद अख्तर (२६), नावीद सय्यद(२२) अशी दोघांची नावे आहेत. यापैकी अख्तर प्रॉडक्शन मॅनेजर तर सय्यद कास्टिंग डायरेक्टर म्हणून बॉलीवूडमध्ये परिचित आहेत.

जानेवारी महिन्यात पश्चिम उपनगरात समाजसेवा शाखेने केलेली ही चौथी कारवाई आहे. पोलीस उपायुक्त (अंमलबजावणी) राजेंद्र दाभाडे, समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांना अख्तर, सय्यद या बॉलीवूडशी संबंधित व्यक्ती वेश्याव्यवसायासाठी मॉडेल, परदेशी तरुणी पुरवतात अशी माहिती मिळाली. रेवले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने बोगस ग्राहक उभा केला.

या ग्राहकाने अख्तर, सय्यद यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी या ग्राहकाला अंधेरी येथील इम्पिरीयल पॅलेस हॉटेल या तीन तारांकित हॉटेलमध्ये बोलावले. तेथे समाजसेवा शाखेने छापा घातला तेव्हा दोन परदेशी तर एक भारतीय तरुणी आढळली. तिघींची सुटका करण्यात आली. तर अख्तर, सय्यद यांना बेडय़ा ठोकण्यात आल्या.

परदेशी तरुणी तुर्कमेनीस्तानच्या नागरिक असून वर्षभरापूर्वी शिक्षणासाठी भारतात आल्या होत्या. सध्या त्या पुणे येथील महाविद्यालयात कला शाखेचे शिक्षण घेत आहेत. मुंबईत येऊन त्या मॉडेलिंग किंवा चित्रपटात ‘एक्स्ट्रा’ म्हणून काम मिळावे यासाठी प्रयत्न करत असतानाच त्यांची ओळख अख्तर, सय्यद यांच्याशी झाली, असे सांगण्यात आले.

सुटका करण्यात आलेल्या भारतीय तरुणीने अंधेरी येथील एका उच्चभ्रू कुंटणखाना आणि तो चालविणाऱ्या महिलेची माहिती समाजसेवा शााखेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार पथकाने तेथे छापा घातला तोवर संबंधित महिला पसार झाली होती. त्या पत्त्यावर पथकाला दोन तरुणी आढळल्या.

हॉटेलमध्ये छापा घालून या पथकाने रुपेरी पडद्यावर अभिनय केलेल्या तीन तरुणींची सुटका केली. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. या प्रकरणातही दलाल महिलेला अटक करण्यात आली होती

यापूर्वीची कारवाई

  •  ३ जानेवारी : जुहू येथील ‘झेड लक्झरी रेसीडेन्सी’ हॉटेलमध्ये छापा घालून समाजसेवा शाखेने उज्बेकीस्तान देशाच्या नागरिक असलेल्या दोन तरुणींची सुटका केली. त्यांना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवत वेश्याव्यवसायात ओढणाऱ्या कािस्टग डायरेक्टर राजेशकुमार लाल याला अटक केली.
  • १४ जानेवारी : वर्सोवा येथून बॉलीवूडशी संबंधित दोन तरुणींची समाज सेवा शाखेने सुटका केली. याही कारवाईत कास्टिंग डायरेक्टर नवीनकुमार आर्या याला अटक केली गेली.
  • १६ जानेवारी : अंधेरी येथील ‘ड्रॅगन फ्लाय’