News Flash

एक्स्प्रेस गाडीतून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

त्यांच्याकडून ८० हजार रुपये किमतीचा आठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

एक्स्प्रेस गाडीतून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ८० हजार रुपये किमतीचा आठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

सीएसएमटीत सकाळी पावणेआठ वाजता कोणार्क एक्स्प्रेसमधून दोन इसम उतरले. त्यांच्याजवळ दोन बॅगा होत्या. ते संशयितरीत्या वावरत होते. फलाट क्रमांक १८ वरील वाहन स्कॅ निंग मशीनच्या जवळून जात असतानाच पोलिसांनी त्यांना हटकले. त्या वेळी दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न के ला असता उपस्थित पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची अधिक चौकशी के ली असता मोहम्मद नदाफ व शंकर पाल अशी दोघांची नावे असल्याचे समजले. सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर कटलरी विकणे व मालीश करण्याचे काम दोघे करत होते. त्यांच्याकडील दोन बॅगांमध्ये ८ किलो वजनाचा गांजा सापडला. त्याची किंमत ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांंनी सांगितले. त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:10 am

Web Title: two arrested for transporting cannabis in express train abn 97
Next Stories
1 “मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा”
2 मुंबईत पुन्हा करोना संसर्ग वाढण्याची भीती!; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
3 Anand Mahindra : “वो कोई और चिराग होते है…” आनंद महिंद्रांचा लाखो आरोग्य सेवकांना शायरीतून सलाम!
Just Now!
X