News Flash

पिस्तुलविक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

प्रत्येकी ३० हजार रुपयांना ते या पिस्तुलांची विक्री करणार होते, अशी माहिती तपासातून समोर आली.

पिस्तुलविक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

मुंबई : मध्य प्रदेशातून पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दादरमधून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून सात देशी बनावटीची पिस्तुले आणि १५ काडतुसे जप्त केली असून मनोजकुमार वैष्णव (२७) आणि करण दास (२१) यांना अटक केली आहे.

मध्य प्रदेशातील दोघे दादर परिसरात पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पथकाने दादर येथे सापळा रचून शनिवारी सकाळी कारवाई के ली. आरोपी दादर उड्डाणपुलाजवळून रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. झडतीत त्यांच्याजवळ सात देशी बनावटीची पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली.

हे दोघे मूळचे राजस्थान येथील आहेत. मध्य प्रदेशातील इंदौर येथून ते ही पिस्तुले घेऊन आले होते. प्रत्येकी ३० हजार रुपयांना ते या पिस्तुलांची विक्री करणार होते, अशी माहिती तपासातून समोर आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 12:18 am

Web Title: two arrested from dadar with seven country made pistol zws 70
Next Stories
1 पेंग्विन देखभाल निविदेला काँग्रेसचा विरोध
2 दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी ‘रिकव्हरी एजंट’चा दबाव; २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या
3 प्रेमभंग झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!
Just Now!
X