बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अर्भक फेकण्यासाठी आलेल्या दोघांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
उद्यानात शुक्रवारी रात्री प्लॅस्टिकची पिशवी घेऊन दोन व्यक्ती जात होत्या. सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानंतर त्यांच्या पिशवीची तपासणी करण्यात आली. पिशवीत अर्भक आढळताच सुरक्षा रक्षकांनी त्वरित कस्तुरबा मार्ग पोलिसांना माहिती दिली. पोलिासांनी अमिन पटेल (२१) आणि त्याच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. ६ महिन्यांचे स्त्री अर्भक फेकण्यासाठी ते आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे दोघेही लालबागच्या मेघवाडी परिसरात राहणारे आहेत. त्यांच्या शेजारी राहणारी एक अल्पवयीन तरूणी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली होती. त्यामुळे तिच्या आईने गर्भपात केला आणि अर्धवट जन्माला आलेले अर्भक फेकण्याची जबाबदारी या तरुणांवर सोपवली.