वर्सोवा येथील समुद्रात फिरण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. उमा शर्मा (२०) आणि संतोष यादव (२१) अशी त्यांची नावे आहेत. साकीनाका येथे राहणारे तिघे मित्र-मैत्रिण गुरूवारी सकाळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. त्यांच्यातील उमाचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी उमेश पाण्यात गेला. मात्र भरती असल्याने तोही पाण्यात ओढला गेला. त्याच्या सोबत असलेल्या मित्राने दोघांना बुडताना पाहून मदतीसाठी धावा केला. वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांनी धाव घेतली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. उमा आणि संतोष पाण्यात बुडाले होते. दुपारी संतोषचा मृतदेह सापडला तर उमाचा मृतदेह काही काळानंतर सापडला . उमा आणि संतोष एकाच महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 14, 2015 2:04 am