05 June 2020

News Flash

Coronavirus : करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांमुळे दोन वसाहती बंद

पोलीस उपनिरीक्षकाला करोनाची लागण झाल्याचे लक्षात येताच ही इमारतही बंद करण्यात आली आहे.

(मुंबई पोलिसांचं संग्रहित छायाचित्र)

केवळ कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची मुभा

मुंबई : पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने खबरदारी घेत प्रशासनाने वरळी पोलीस कॅम्पमधील रहिवासी इमारतीमध्ये ये-जा करण्यास मज्जाव केला आहे. येथील रहिवाशांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. तर बोरीवलीतील योगीनगर भागातील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला करोनाची लागण झाल्याचे समजताच ही इमारत सील करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीस कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या योगीनगर वसाहतीमधील काही कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा झटत आहेत. टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार बंद असले तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी त्यांना करोनाचे संक्रमण होण्याची भीती लागून राहिली आहे. वरळीतील पोलीस कॅम्पमधील इमारत क्रमांक ४५ मध्ये तीन रुग्ण सापडल्यानंतर पोलिसांकडून ही इमारत सील करण्यात आली आहे. त्याचबरोबर खबरदारी घेत या इमारतीमधील २० कुटुंबांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. या इमारतीबाहेर पोलीस कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांचा पहारा असून कोणालाही बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. तर बोरीवलीतील योगीनगर भागातील वसाहतीमधील रहिवासी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला करोनाची लागण झाल्याचे लक्षात येताच ही इमारतही बंद करण्यात आली आहे. या इमारतीत २३ कुटुंबे वास्तव्याला आहेत. पोलीस यंत्रणा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच कामावर जाण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या दोन्ही ठिकाणी इमारतीत वास्तव्याला असलेल्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास त्यांना प्रशासनाकडून गरजेच्या वस्तू पुरविल्या जात आहेत. तसेच बाहेरील व्यक्तीने किराणा अथवा सामान आणून दिल्यास ते इमारतीच्या गेटबाहेरच ठेवले जाते. त्यानंतर संबंधित घरातील व्यक्ती गेटवर येऊन हे सामान घेऊन जातात असे पोलिसांनी सांगितले.  यातील योगीनगर भागातील इमारतीमधील रहिवाशांची करोना तपासणी केली असून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. हे अहवाल प्राप्त झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण विलगीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 2:52 am

Web Title: two colonies quarantine due to police personnel found coronavirus positive zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 coronavirus  : १४ हजार करोना संशयितांच्या तपासण्या
2 Coronavirus outbreak : बेस्ट प्रवासात सामाजिक अंतराचे तीनतेरा
3 Coronavirus : अत्यावश्यक सेवेकरींचा संकटांशी सामना
Just Now!
X