24 September 2020

News Flash

डोंबिवलीत दोघांचा गुदमरून मृत्यू

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मलनिसारण वाहिनी टाकण्याच्या कामासाठी २२ फूट खोल चेंबरमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. डोंबिवलीतील उमेशनगर भागात बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना

| November 29, 2012 04:00 am

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मलनिसारण वाहिनी टाकण्याच्या कामासाठी २२ फूट खोल चेंबरमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. डोंबिवलीतील उमेशनगर भागात बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.
पालिकेतर्फे उमेशनगर, देवीचा पाडा येथे जवाहरलाल नेहरू अभियानातून मलनिसारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सिकंदर रॉय (४०) हा २२ फूट खोल चेंबरमध्ये उतरला. त्यापाठोपाठ संजय पवार (३५) हाही खाली उतरला. मात्र, त्यानंतर काही कळायच्या आतच चेंबरमधील गॅसने गुदमरून दोघे मरण पावले. हे दोन्ही कामगार कंत्राटी असल्याचे सांगण्यात येते. याबाबत पालिकेच्या संबंधित अभियंत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे काम सुरू असताना कल्याण पूर्वेत एक कामगार मरण पावला होता.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2012 4:00 am

Web Title: two dead in dombivli
Next Stories
1 गाडीखाली आलेल्या तरुणाचा तुटलेला हात १६ तासांनी मिळाला
2 संपूर्ण ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे-अडवाणी
3 वसईत प्राचीन शिलालेख सापडला
Just Now!
X