News Flash

सीसीटीव्हीत दिसले दोन परदेशी

कुलाबा येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये स्किमर लावून डेटा चोरी प्रकरणात परदेशी व्यक्ती असल्याचा संशय अधिक पक्का होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन परदेशी

| June 19, 2013 03:33 am

कुलाबा येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये स्किमर लावून डेटा चोरी प्रकरणात परदेशी व्यक्ती असल्याचा संशय अधिक पक्का होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन परदेशी व्यक्ती एटीएम मशीनमध्ये स्किमर उपकरण लावताना दिसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या दोन व्यक्ती गोऱ्या रंगाच्या आणि भुऱ्या केसांच्या असून ते दोघे युरोपियन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या व्यक्तींबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमधून ४० खातेधारकांच्या खात्यातून लाखो रुपये ग्रीस देशातून काढण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून अ‍ॅक्सिस बॅंकेने यापुर्वीच पाच हजार खातेधारकांचे एटीएम कार्ड ब्लॉक केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 3:33 am

Web Title: two foreigner viewed in cctv
टॅग : Cctv
Next Stories
1 आतापर्यंत ३५ टक्के पाऊस
2 दर्शनासाठी गेलेल्यांना ‘विश्वरूप दर्शन’
3 मध्य रेल्वेचे पहिले पाढे पंचावन्न!
Just Now!
X