07 December 2019

News Flash

मुंबई: जुहूजवळ समुद्रात बुडून दोन मुलींचा मृत्यू

यावेळी चौपाटीवर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

(सांकेतिक छायाचित्र)

जुहू चौपाटीवर फिरायला गेलेल्या दोन मुली समुद्राच्या पाण्यात बुडाल्याचे वृत्त आहे. या दोघीजणी पाण्यात उतरल्याने लाटांसोबत त्या पाण्यात ओढल्या गेल्याने बुडाल्याचे सुत्रांकडून कळते. यावेळी चौपाटीवर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रविवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, माया महेंद्र (वय २९) आणि निशा कंवलपाल सिंग (वय १५) अशी बुडालेल्या दोन मुलींची नावे आहेत. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या अंधेरी कोळीवाड्याजवळील जुहू चौपाटीवर गेल्या होत्या. त्यानंतर काही वेळाने त्या समुद्राच्या पाण्यात उतरल्या. दरम्यान, त्या अचानक पाण्यात बुडायला लागल्या, दोघींनी बचावासाठी आरडाओरडा केला. यावेळी त्यांच्या मदतीसाठी किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, तोपर्यंत त्या बुडाल्या होत्या.

या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या दोघींचे मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

First Published on July 21, 2019 9:43 pm

Web Title: two girls died due to drowning at juhu chowpatty today aau 85
Just Now!
X