29 September 2020

News Flash

बस दरीत कोसळून दोन ठार

पालघर जिल्हय़ातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोरजवळ लक्झरी बस दरीत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

| June 13, 2015 04:16 am

पालघर जिल्हय़ातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोरजवळ लक्झरी बस दरीत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातात सुदाम गुप्ता (६२), अशरफअली नागोरी (३०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले. जखमींवर मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. लक्ष्मी ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून अहमदाबादकडे जात होती. मनोरजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोला धडक देऊन बस दरीत कोसळली. बस जवळपास ४० फूट खाली गेली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना  रुग्णालयात नेले. मनोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 4:16 am

Web Title: two killed as bus falls in valley
Next Stories
1 सागरी मार्ग पालिकेकडून; सेनेचा निर्धार
2 राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार!
3 मान्सूनचे मुंबईत आगमन
Just Now!
X