News Flash

बॉयलर स्फोटातील दोन जखमींचा मृत्यू

मुंब्रा- पनवेल मार्गावरील गोठेघर येथील औद्योगिक विभागातील यंत्र सामुग्रीची विल्हेवाट लावणाऱ्या एका कार्यशाळेत शनिवारी दुपारी भीषण स्फोट होऊन झालेल्या अपघातातील आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला

| April 14, 2014 02:26 am

मुंब्रा- पनवेल मार्गावरील गोठेघर येथील औद्योगिक विभागातील यंत्र सामुग्रीची विल्हेवाट लावणाऱ्या एका कार्यशाळेत शनिवारी दुपारी भीषण स्फोट होऊन झालेल्या अपघातातील आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला आहे. या दोघांवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या अपघातातील मृतांचा आकडा आता तीनवर गेला आहे.
या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींमध्ये फुलचंद त्रिवेणी प्रसाद (३५), नवमन नरसिंह यादव (३२) आणि रामलाल यादव (३२) या तिघांचा समावेश होता. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तिघांवर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री उपचार सुरू असतानाच फुलचंद आणि नवमन या दोघांचा मृत्यू झाला. तर रामलाल याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कार्यशाळेच्या मालकाविरोधात शीळ- डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:26 am

Web Title: two killed in boiler blast
Next Stories
1 सांताक्रुझ-विक्रोळी जोडरस्ता लवकरच सुरू
2 कोल्हापुरे, झाकीर हुसेन यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
3 शीव रुग्णालयात अवयवदान कार्यशाळा
Just Now!
X