News Flash

लोकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दिवसभरात दोन वेगळ्या घटनांमध्ये लोकलची धडक बसून दोन जणांचा मृत्यू झाला.

| July 26, 2014 05:53 am

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दिवसभरात दोन वेगळ्या घटनांमध्ये लोकलची धडक बसून दोन जणांचा मृत्यू झाला. तर डोंबिवली रेल्वे स्थानकात एक महिला लोकलमध्ये चढताना फलाटावर पडून गंभीर जखमी झाली. ठाकुर्ली जवळील महाविद्यालयात जात असताना सकाळी जय लोढय़ा (२१) या तरुणाचा तर रेल्वे फाटकातून जात असताना जनार्दन गवई (६०) यांचा लोकलच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. प्रियांका कोळमकर लोकलमध्ये चढत असताना गर्दीतील रेटारेटीत त्या सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर पडल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 5:53 am

Web Title: two killed in local train accident
Next Stories
1 आयुक्तांच्या घरासमोर ‘मनसे वडापाव’
2 बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी आता वनकर्मचारी पिंजऱ्यात!
3 गुंतवणूक असो वा कर्ज, शिस्त आणि ध्यास हवाच!
Just Now!
X