तालुक्यातील पागोटे येथे राहणाऱ्या विलास रामगडे (३६) याने आपल्या तीन महिन्यांच्या गरोदर पत्नीसह भावजयीची तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली़
पागोटे गावात भाडय़ाने राहणाऱ्या विलासने आपली पत्नी बारकू विलास रामगडे(३२) व भावजय सीमा विशाल रामगडे(२६) या दोघींची हत्या केली़ त्याची पत्नी तीन महिन्यांची गरोदर होती. गर्भातील मुलाचीही हत्या झाल्याने हे तिहेरी हत्त्याकांड घडल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस. बी. कांबळे यांनी दिली आहे.
हत्या मागचे कारण समजू शकलेले नाही. मात्र विलास याला उरण पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल़े सीमा जीवंत असल्याने तिला दवाखान्यात नेण्यात येण्यात आल़े मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 3:07 am