News Flash

देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी आणखी दोन याचिका

वकील घन:श्याम उपाध्याय आणि पुणेस्थित सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी या याचिका केल्या आहेत.

संग्रहीत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या आणि एकू णच संपूर्ण घटनाक्र माच्या चौकशीच्या मागणीसाठी आणखी दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.

परमबीर यांनीही देशमुख यांच्यावरील आरोपांच्या आणि त्यांच्या कारभाराच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी गुरुवारी फौजदारी जनहित याचिका केली होती.  वकील घन:श्याम उपाध्याय आणि पुणेस्थित सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी या याचिका केल्या आहेत. देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला या दोघांनी आपल्या याचिकेत दिला आहे.

उपाध्याय यांनी आपल्या याचिकेत परमबीर यांनी देशमुख यांच्यावर के लेल्या आरोपांची सखोल चौकशीचे आदेश देण्याची मागणी के ली आहे. पोलीस आणि राजकीय नेत्यांंकडून खंडणी मागितली जात असल्याच्या आरोपांची, उद्योगपती मुके श अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके  ठेवण्यापासून ते परमबीर यांनी देशमुख यांच्यावर आरोप करण्यापर्यंतच्या सगळ्या घटनाक्र माची सीबीआय वा स्वतंत्र तपास यंत्रणेतर्फे  चौकशी करावी, अशीही मागणी के ली आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या कथित गुन्ह््याकडे डोळेझाक केल्याप्रकरणी देशमुख, परमबीर यांच्यावर कारवाईच्या आदेशाची मागणी पाटील यांनी याचिके द्वारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:36 am

Web Title: two more petitions for inquiry into allegations against deshmukh abn 97
Next Stories
1 मॉलमधील अग्निसुरक्षा वाऱ्यावर
2 Sunrise Hospital Fire : रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट
3 आगीत १२ करोना रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X