25 November 2017

News Flash

विनयभंग प्रकरणी विद्यापीठातील दोन प्राध्यापकांना अटक

महिला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर येत असताना मुंबई विद्यापीठातही शैक्षणिक

मुंबई | Updated: December 15, 2012 12:56 PM

महिला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर येत असताना मुंबई विद्यापीठातही शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या तीन महिला सहकाऱ्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी बापू चौगुले आणि नीलेश लोहार या दोन प्राध्यापकांना मुंबई पोलिसांनी कलिना येथील संकुलातून अटक केली.
शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख बापू चौगुले (५७) आणि सहायक प्राध्यापक नीलेश लोहार (३९) यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार एक अध्यापक महिला, गं्रथालयात काम करणारी महिला आणि एका सफाई कर्मचारी महिला अशा तिघींनी पोलिसांच्या संकेतस्थळावर केली होती. ही तक्रार चौकशीसाठी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांकडे पाठवण्यात आली. चौकशी सुरू झाल्यावर चौगुले आणि लोहार यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. मागच्या आठवडय़ात न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला.

First Published on December 15, 2012 12:56 pm

Web Title: two mu professors held for molesting colleagues
टॅग Crime,Professors