News Flash

सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यासाठी दोन नवे उड्डाणपूल

सांताक्रूझ- चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाला पूरक म्हणून कुल्र्यातील सीएसटी रस्त्यानजीक दोन नवे उड्डाणपूल बांधण्याची योजना मुंबई महानगर

| September 2, 2013 03:44 am

सांताक्रूझ- चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाला पूरक म्हणून कुल्र्यातील सीएसटी रस्त्यानजीक दोन नवे उड्डाणपूल बांधण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखली आहे. तर मिठी नदीजवळील ४० मीटर लांबीच्या पुलाची लांबी व रूंदी वाढवण्याचाही घाट घातला जाणार आहे. या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया ‘एमएमआरडीए’ने सुरू केली आहे.
पहिला नवीन उड्डाणपूल वांद्रे-कुर्ला संकुलाकडून कुल्र्याकडे येणाऱ्या रस्त्यापासून सीएसटी जंक्शनपर्यंत असेल तर दुसरा पूल कलिना विद्यापीठाकडे जाणारा रस्ता आणि सीएसटी रस्त्याला जोडेल. तसेच सध्याचा ४० मीटर लांब व ३० मीटर रूंद पूल १०० मीटर लांब आणि ४५ मीटर रूंद करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे सीएसटी रस्त्यावरील वाहतूक वाढण्याचा अंदाज आहे. ही वाहतुक सुरळीत करण्यासाठी व वांद्रे-कुर्ला संकुलाकडील वाहतूक थेट जोडरस्त्यापर्यंत आणण्यासाठी हे नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. सल्लागारांकडून पुलाबाबत सविस्तर अहवाल आल्यानंतर त्यावर आधारीत निवीदा काढल्या जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 3:44 am

Web Title: two new flyovers for santa cruz chembur link road
Next Stories
1 बारबालेचा मृत्यू मारहाणीमुळे नव्हे तर नैसर्गिक
2 दाभोलकरांच्या विचारांचे आचरण हवे-पुष्पा भावे
3 धमकावल्याप्रकरणी ‘सफायर कॅपिटल’च्या मालकास अटक
Just Now!
X