07 June 2020

News Flash

मंत्रालयातल्या जाळीवर दोन शिक्षकांची उडी, पोलिसांची धावपळ

या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

मंत्रालयातल्या जाळीवर दोघांनी उड्या मारल्या. उंचावरुन या दोन व्यक्तींनी उड्या टाकली. ही घटना घडताच पोलिसांची या व्यक्तींना वाचवण्यासाठी तारांबळ उडाली. मंत्रालयात जाळी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे अशी या दोन शिक्षकांची नावं आहे. ३०० विनाअनुदानित शाळांना मान्यता देण्याचा मुद्दा होता. त्यासाठी शिक्षकांचं एक शिष्टमंडळ मंत्रालयात भेटीसाठी आलं होतं. मात्र मंत्र्यांची भेट झाली नाही त्यामुळे दोन शिक्षकांनी उडी मारली. मंत्रालयात जाळी लावण्यात आलेली असल्याने या दोघांना काहीही झालं नाही. मात्र त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या दोघांना आता पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अपंग शाळेतले हे शिक्षक आहेत. हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे अशी या दोघांची नावं आहेत. ३०० विनाअनुदानित शाळांना अनुदान मान्य करावं अशी मुख्य मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 6:28 pm

Web Title: two people hemant patil and arun netore jumped from second floor in mantralaya building on the safety net scj 81
Next Stories
1 आरे प्रकरणी मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतायत, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
2 मेट्रोला पाठिंबा देणं बिग बींना पडलं महागात; ‘जलसा’बाहेर आंदोलन
3 ‘आदित्य ठाकरेंनी ऑर्डर केलंय’ सांगत डिलेव्हरी बॉयने ‘मातोश्री’च्या कर्मचाऱ्यांना घातला गंडा
Just Now!
X