News Flash

सांताक्रूझ चोरीप्रकरणी दोघांना अटक

चाकूचा धाक दाखविला आणि मालकाला नायलॉनच्या दोरीने बांधून १५ लाखांचा ऐवज चोरून नेला.

सांताक्रूझ पूर्व येथील गोळीबार रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानात शिरून १५ लाखांची चोरी करणाऱ्या दोघा भावांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटने अटक केली. राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला.

सांताक्रूझ पूर्वेतील मिठालाल ज्वेलर्सच्या दुकानात शिरून चार अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखविला आणि मालकाला नायलॉनच्या दोरीने बांधून १५ लाखांचा ऐवज चोरून नेला.
अंधेरी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ, निरीक्षक सुनील माने, सहायक निरीक्षक विठ्ठल चौगुले आदींनी तपास करून मदनसिंग रोड सिंग ससाणा राजूपत आणि मनोहर या भावांना अटक केली. दुकानातील कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून संगनमत करून चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. हे दोघे राजस्थान येथे गावी पळून जाण्याच्या तयारीत होते. हे दोघे कांदिवली रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांना अटक करून त्यांच्याकडील ऐवज हस्तगत करण्यात आल्याचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2015 12:01 am

Web Title: two peoples arrest in santacruz
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांचा ‘गुगल हँगआऊट’ द्वारे लोकसत्ताच्या वाचकांशी संवाद
2 मुख्यमंत्री, संपादकांसोबत आज ‘गुगल हँगआऊट’!
3 गायक अभिजित भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
Just Now!
X