मुंबई : लोकलच्या धडके त सोमवारी मध्यरात्री दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. खार ते वांद्रे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. रेल्वेचे अभियंता राजकु मार शर्मा आणि रूळ दुरुस्ती करणारे कर्मचारी नागेश सावंत अशी त्यांची नावे आहेत. मध्यरात्री १२ च्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने जलद लोकल जात होती. खार रोड स्थानक पार करत असतानाच दोन जण दोन रेल्वे मार्गिकेच्या मधून जात होते. मोटरमनने गाडीचा हॉर्न वाजवून त्यांना लोकल येत असल्याची कल्पना दिली. आपत्कालीन ब्रेकही लावला. मात्र बाजूला जाण्याऐवजी दोघेही दोन मार्गिके त जागेवरच बसले. मात्र त्यांचा अंदाज चुकल्याने लोकलची धडक त्यांना बसली आणि यात ते जबर जखमी झाले. या घटनेची माहिती त्वरित गार्डला दिली. गार्ड, रेल्वे पोलीस, हमाल यांनी त्यांना रुग्णालयात दाखल के ले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित के ले.