News Flash

पश्चिम- मध्य रेल्वेवरील दोन फाटक बंद

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान असलेले फाटक क्रमांक २४ तर मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान असलेले फाटक क्रमांक नऊ ही दोन्ही फाटके दुरूस्तीच्या

| February 25, 2013 02:42 am

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान असलेले फाटक क्रमांक २४ तर मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान असलेले फाटक क्रमांक नऊ ही दोन्ही फाटके दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आली आहेत.
पश्चिम रेल्वेवरील फाटक २२ फेब्रुवारीच्या रात्रीपासून ते १३ मार्चच्या पहाटे सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवरील फाटक २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानचे नऊ क्रमांकाचे फाटक बंद असले तरी प्रवाशांनी सात क्रमांकाच्या फाटकाचा उपयोग करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
प्रगती एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ
मुंबई-पुणे दरम्यान पनवेलमार्गे जाणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसला जादा वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ही डब्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. वातनुकूलित चेअर कारचा हा डबा कायमस्वरूपी जोडण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:42 am

Web Title: two road crossing closed on western central railway
टॅग : Railway
Next Stories
1 बबन मिंडे यांच्या ‘कॉमन मॅन’ला सुभाष भेंडे पुरस्कार
2 विवेकानंद विचारांवर शिकागोत संमेलन व्हावे- अडवाणी
3 मॅरेथॉन स्पर्धेतील धावपटूचा मृत्यू
Just Now!
X