चेंबूरच्या सिंधी सोसायटीत मृतावस्थेत आढळलेल्या दोन बहिणींच्या मृत्यूमागील कारणाचा उलगडा झाला आहे. राजावाडी रुग्णालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालात एका बहिणीचा घरात पडल्यानंतर नाकाला झालेल्या जखमेतून रक्तस्राव झाल्याने निधन झाले तर दुसरी बहीण हा धक्का सहन न झाल्याने निधन पावल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, चेंबूर पोलिसांनी या बहिणींच्या एका नातेवाईकाचा शोध लावला असून त्याच्याकडूनच बहिणींची ओळख पटविण्यात येणार आहे.
चेंबूरच्या सिंधी सोसायटीमधील त्रिशूल अपार्टमेंटच्या एका घरामधून गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दरुगध येत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. दार तोडल्यानंतर घरात राहणाऱ्या मोहिनी जेठवानी आणि बसंती जेठवानी या वयोवृध्द बहिणी मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.
घरातील कागदपत्रांवरुन या बहिणींची नावे समजली तरी कोणीही जवळचे नातेवाईक नसल्याने दोघींचीही तोंडओळख पटविता येत नव्हती.