News Flash

बेलापूर स्थानकाजवळ दोन लोकल समोरासमोर?

मध्य रेल्वेने यासंदर्भातले स्पष्टीकरण दिले आहे

हार्बर मार्गावरील नेरुळ बेलापूर स्थानकाजवळ दोन लोकल समोरासमोर आल्या मात्र थोडक्यात अपघात टळला अशी चर्चा प्रवाशांमध्ये रंगली होती. मात्र काही वेळातच या चर्चेमध्ये काही तथ्य नव्हते ही बाब समोर आली. बेलापूर ते खारघर स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर रुळाला तडे गेल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावर एकामागोमाग एक लोकलच्या रांगा लागल्या. हे पाहिल्यानंतर अनेक प्रवाशांना दोन लोकल समोरासमोर आल्या आहेत असे वाटू लागले. या घटनेचे फोटोही काहींनी सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने रुळांची दुरुस्ती केली आहे. तसेच इथली लोकल सेवा त्यामुळे सुरु झाली आहे.

संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे घटना घडली. बेलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ पनवेल दिशेने रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे त्या फलाटावर येणारी लोकल आधीच थांबवून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर वळवण्यात आली. त्यावेळी या लोकलच्या मागे असलेली लोकल थांबवण्यात आली. त्यामुळे लोकांना दोन लोकल एकमेकांसमोर आल्या आहेत असे वाटले. मात्र प्रत्यक्षात त्या एकामागोमाग होत्या. असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी एका वृत्तवाहिनीला दिले. या मार्गावर ४ ते ५ च्या दरम्यान वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती त्यामुळे लोकलच्या रांगा लागल्या. त्यामुळे लोकांना पाहताना दोन लोकल समोरासमोर आहेत असे वाटले असावे असेही सुतार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान ज्या काही चर्चा प्रवाशांमध्ये रंगल्या होत्या त्यामुळे त्यांचाच जीव काही काळ टांगणीला लागला होता. अगदी थोडक्यात अपघात टळला अशीही चर्चा रंगली होती. मात्र या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं रेल्वेने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर समोर आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 7:59 pm

Web Title: two train came face to face on harbour line near belapur station do you konw what happened
Next Stories
1 महाराष्ट्रीयन चित्रशैलीवर येणार नवा ग्रंथ
2 दिवाकर रावते खरंच नाराज आहेत का?; पहा काय म्हणाले…
3 ‘शिवभोजना’च्या अटींवरून निलेश राणेंचा शिवसेनेला टोला
Just Now!
X