News Flash

व्यापाऱ्याला लुटण्यासाठी दुचाकी स्वारांचा हवेत गोळीबार

पैशांची पिशवी घेऊन चाललेल्या एका व्यापाऱ्यावर अज्ञात दुचाकी स्वारांनी गोळीबार केल्याची घटना कल्याणमधील गोविंदवाडी येथे घडली.

| August 19, 2013 03:39 am

पैशांची पिशवी घेऊन चाललेल्या एका व्यापाऱ्यावर अज्ञात दुचाकी स्वारांनी गोळीबार केल्याची घटना कल्याणमधील गोविंदवाडी येथे घडली. नागरिकांनी दुचाकी स्वारांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.
मुनीर शेख हे व्यापारी ८५ हजार रुपये पिशवीतून घेऊन बाजार समितीत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मुनीर यांच्या हातामधील पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मुनीर यांनी ओरडा करताच नागरिक जमा झाले. दुचाकी स्वारांनी हवेत गोळीबार करून पलायन केले. बाजारपेठ पोलीस याप्रकरणाचा तपास करीत
आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 3:39 am

Web Title: two wheeler rider fire shoots in air loot merchant
Next Stories
1 ‘सिंधुरक्षकां’चे कुटुंबीय मुंबईत दाखल
2 गणेशोत्सव वर्गणी गोळा करण्यावरून आग्रीपाडय़ात दगडफेक
3 ‘शिवाचा’ मुंबईला रामराम!
Just Now!
X