18 February 2019

News Flash

‘टू व्हिलर टॅक्सी’ सेवा लवकरच देशभरात

ई-वाहने परवानेमुक्त करणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (छायाचित्र: एएनआय)

ई-वाहने परवानेमुक्त करणार

इंधन दरवाढीचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘टू व्हिलर टॅक्सी’ची सेवा सुरू  करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात देशभरात लवकरच केली जाईल, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले.

गणेशोत्सवासाठी गडकरी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलचे दर  कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणपूरक इंधनाचा पेट्रोलमध्ये वापर वाढवून किमती आठ ते दहा रुपयांनी कमी करणे शक्य आहे. दरवाढीची झळ नागरिकांना कमीत कमी बसावी म्हणून ‘ टू व्हिलर टॅक्सी’ची सेवा सुरू करण्याचे धोरण स्वीकारले असून मंत्रिमंडळात त्यावर चर्चा झाली. यासोबतच सांडपाण्यातून मिथेन काढून सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसेस चालवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात गंगेच्या शुद्धीकरणातून करण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले.  इलेक्ट्रिकवर चालणारे  ई-वाहन आणि पर्यायी इंधनावर चालणाऱ्या टॅक्सीसाठी आता परमीटची गरज भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रीन बसबाबत लवकरच निर्णय

ग्रीन बसबाबत स्कॅनिया कंपनीसोबत चर्चा झाली.  ते बस चालवण्यासाठी सकारात्मक आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

First Published on September 15, 2018 1:32 am

Web Title: two wheeler taxi nitin gadkari