News Flash

अर्नाळा बीचवर बुडून एका महिलेचा मृत्यू

या घटनेत एक महिला बेशुद्ध झाली आहे तिच्यावर उपचार सुरु आहेत

(संग्रहित छायाचित्र)

विरार च्या अर्नाळा बीचवर एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. तर एक महिला बेशुद्ध झाली. बेशुद्ध महिलेवर विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हीना नजीर अहमद असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती २५ वर्षांची होती. तर फरहाना आफ्रिन असं बेशुद्ध झालेल्या आणि रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या महिलेचे नाव आहे.

हीना नजीर अहमद आणि फरहाना आफ्रिन या दोघीजणी भिवंडी येथून आल्या होत्या. भिवंडीहून १० ते १२ जणांचा एक ग्रुपच पिकनिकसाठी आला होता. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघीही जणी पाण्यात बुडल्या. त्यापैकी एकीला बाहेर काढण्यात यश आलं दुसरी महिला मात्र बुडाली आणि तिचा मृत्यू झाला. विरारच्या रुग्णालयात फरहानावर उपचार सुरु आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 1:35 pm

Web Title: two women drown at arnala beach one dead one hospitalised scj 81
Next Stories
1 ठाणे : 2 बेपत्ता बालमित्रांचे मिठागर खाडीत आढळले मृतदेह
2 रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक
3 पदपथांवर मृत्यूची दारे!
Just Now!
X