25 February 2021

News Flash

Mumbai plane crash : सहा वर्षांपूर्वी चार्टर्ड विमानाने केले होते शेवटचे उड्डाण

पुण्यातील एका कंपनीने उत्तर प्रदेश सरकारकडून हे विमान विकत घेतले. त्यानंतर या कंपनीने ते विमान यू वाय अॅव्हिएशन कंपनीला विकले. या विमानावर दुरुस्तीसाठी मोठा खर्च

घाटकोपरमध्ये गुरुवारी दुपारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या चार्टर्ड विमानाने सहा वर्षांपूर्वी शेवटचे उड्डाण केले होते. मागच्या दीडवर्षांपासून हे विमान इनडॅमर या मेंटेन्स कंपनीच्या हँगरमध्ये उभे होते. या विमानामध्ये मोठया प्रमाणावर दुरुस्तीची आवश्यकता असल्याने हे विमान हँगरमध्ये होते अशी माहिती यू वाय अॅव्हिएशन कंपनीचे मॅनेजर अनिल चौहान यांनी दिली. या विमानाने शेवटचे उड्डाण कधी केले  या प्रश्नावर अनिल चौहान यांनी सहावर्षांपूर्वी या विमानाने शेवटचे उड्डाण केले होते असे सांगितले.

पुण्यातील एका कंपनीने उत्तर प्रदेश सरकारकडून हे विमान विकत घेतले. त्यानंतर या कंपनीने ते विमान यू वाय अॅव्हिएशन कंपनीला विकले. या विमानावर दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागणार होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान विकून टाकण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश सरकारमधील एका माजी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

तीनवेळा या विमानाच्या लिलावाचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर अखेर २०१४ मध्ये या विमान विक्रीचा व्यवहार यशस्वी झाला. २००९ मध्ये अलहाबादमध्ये या विमानाला अपघात झाला होता. त्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान विकण्याचा निर्णय घेतला. या विमानाला उड्डाणासाठी आवश्यक असणारे एअरवर्दीनेस प्रमाणपत्रही मिळाले नव्हते. या विमानाने गुरुवारी दुपारी जुहू विमानतळावरुन उड्डाण केले त्यावेळी इनडॅमरच्या इंजिनिअसर्सनी उड्डाणाचा एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईत दाट लोकवस्तीच्या भागात हे विमान कोसळल्याने डीजीसीएने या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. डीजीसीएच्या सुरक्षा शाखेने या अपघाताची चौकशी सुरु केली आहे असे इनडॅमरचे सीईओ राजीव गुप्ता म्हणाले. ही दुर्घटना घडली त्यावेळी मुंबईत खराब हवामान होते. आकाशात पावसाळी ढग दाटले होते. विमानाने चाचणीसाठी उड्डाण केलेले असताना ही दुर्घटना घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 9:26 am

Web Title: u y aviation pvt ltds charted plane crash at ghatkopar
Next Stories
1 Mumbai plane crash: विमानाला नव्हते मिळाले एअरवर्दीनेस प्रमाणपत्र
2 नाणार प्रकल्प म्हणजे कोकणी बांधवांना गॅस चेंबरमध्ये मारण्याचा कट – उद्धव ठाकरे
3 कोल्हापूर डीसीसी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, पेन्शनमध्ये चौपट वाढ
Just Now!
X