News Flash

उबरने बंद केलं मुंबईतलं ऑफिस, मात्र कंपनी ग्राहकांना म्हणतेय…

ग्राहक असाल तर तुम्हाला मिळत राहिल सेवा असंही उबरने म्हटलंय

उबर आणि ओला या दोन कॅब कंपन्या सध्याच्या घडीला खासगी प्रायव्हेट टॅक्सी सर्व्हिस देणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांपैकी उबर या कंपनीने त्यांचं मुंबईतलं ऑफिस बंद केलं आहे. त्याचं मुख्य कारण आहे करोना आणि त्यामुळे जगावर ओढवलेलं आर्थिक संकट. लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात आता उबरचाही समावेश झाला आहे. मात्र मुंबईतलं ऑफिस बंद झालं असलं तरीही तुम्ही जर उबरचे ग्राहक असाल तर तुम्हाला उबरची सुविधा मिळत राहिल असंही कंपनीने स्पष्ट केलंय. मुंबईतील ऑफिस डिसेंबर महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय उबरने घेतला आहे.

कंपनीने ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राईड हेलिंग कंपनीने जगभरातले ६७०० कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर उबरने महिन्याभराने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने जागतिक पातळीवर घेतलेल्या निर्णयामुळे भारतातील ६०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.

सध्याच्या घडीला खासगी कॅब बुकिंगला महत्त्व आलं आहे. अनेकदा लोक आपली कार वापरण्याऐवजी थेट खासगी कॅब सेवेला प्राधान्य देतात. अशात आता उबरने मुंबईतलं ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 2:15 pm

Web Title: uber shuts down mumbai office as part of global cost cuts scj 81
टॅग : Uber
Next Stories
1 मुंबईपेक्षा आता ठाण्यात करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण जास्त!
2 मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा
3 दोन किमी परिघातच संचाराची अट रद्द
Just Now!
X