दरवर्षीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहरातील नालेसफाईची गुरुवारी पाहणी करणार आहेत.  महापालिकेचे आयुक्त अजोय मेहताही यावेळी पालिकेच्या कामाचा आढावा घेतील. शहरात सुमारे ३ लाख २८ हजार मीटर लांबीचे नाले असून त्यातून ३ लाख ६० हजार क्युबिक मीटर गाळ काढावा लागणार आहे. हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करायचे असून आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. याचप्रमाणे २३ हजार मीटर लांबीच्या मिठी नदीतील एक लाख ७८ हजार क्युबिक मीटर गाळ हटवावा लागणार असून या नदीतील गाळ काढण्याचे कामही ४० टक्के पूर्ण झाल्याचे घनकचरा व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.