News Flash

आठवलेंच्या खासदारकीसाठी उद्धव ठाकरेंची मध्यस्थी?

रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख

| November 6, 2013 03:05 am

रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे कळते. अर्थात भाजपच्या कोटय़ातून त्यांना खासदारकी मिळावी, असाच त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत तीन जागा आणि राज्यसभेची एक जागा मिळावी, अशी आरपीआयची जुनीच मागणी आहे. गेल्या आठवडय़ात महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. त्या बैठकीत आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी आणि त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुखांनी लवकर करावा, अशी मागणी केली होती.
या बैठकीनंतर रामदास आठवले यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रविवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी  आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू, असे आश्वासन उद्धव यांनी दिल्याचे समजते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 3:05 am

Web Title: uddhav thackeray helps ramdas athawale for rajya sabha membership
Next Stories
1 दिवस ‘दिवाळीजन्य’ आजारांचे!
2 मागासवर्गीयांच्या २३ हजार कोटींच्या निधीला २० वर्षांत कात्री
3 अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी तिघांना अटक
Just Now!
X