News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली लता मंगेशकरांची भेट

लता मंगेशकर यांना ११ नोव्हेंबरपासून ब्रीचकँडी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रीचकँडी रुग्णालयात जाऊन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्या रुग्णालयात दाखल आहेत.

लता मंगेशकर यांना ११ नोव्हेंबरपासून ब्रीचकँडी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. निमोनिया आणि श्वसनाचा त्रास या दोन कारणांमुळे त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

जागतिक किर्ती लाभलेले आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. फारुख उद्वारिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती दिली आहे. सुरुवातीचे काही दिवस लता मंगेशकर यांना लिक्विड डाएटवर ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना हलका आहार देण्यात येतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 10:20 am

Web Title: uddhav thackeray meet lata mangeshkar breach candy hospital avb 95
Next Stories
1 गांधी परिवाराला धोका कमी झाला हे नक्की कोणाला वाटतं ?; शिवसेनेचा सवाल
2 आघाडी सरकारची आज बहुमत चाचणी; १७० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा
3 शिंतोडे उडविणाऱ्या नस्ती तयार केल्या तर खबरदार!
Just Now!
X