25 February 2020

News Flash

स्वातंत्र्यवीर सावरकरांना न मानणाऱ्यांना चौकात फटकावले पाहिजे-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांची रोखठोक आणि आक्रमक भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरक यांना न मानणाऱ्या भर चौकात फटकावले पाहिजे अशी रोखठोक आणि आक्रमक भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावकरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना NSUI या मागे असल्याचे समजते आहे. या घटनेबाबत उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जे लोक सावरकरांना मानत नाहीत त्यांना भर चौकात फटकावले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी पीक विमा संदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना दिल्ली विद्यापीठातल्या घटनेबाबत प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतली आहे.

जे लोक सावरकरांना मानत नाहीत त्यांना एकदा चौकात फटकावले पाहिजे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सावकरांनी किती कष्ट घेतले आहेत हे त्याशिवाय त्यांना कळणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सावरकरांचा अपमान राहुल गांधी यांनीही केला होता. ही जी अवलाद आहे त्यांना स्वातंत्र्याचे मोल कळणार नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

First Published on August 23, 2019 2:58 pm

Web Title: uddhav thackeray reaction on savarkar statue vandalized in delhi scj 81
Next Stories
1 बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; २३.१७ टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण
2 भाजपामध्ये प्रवेश करणार की नाही ? उदयनराजे म्हणतात…
3 शेतकरी पीक विमा योजनेतील ‘झारीतले शुक्राचार्य’ शोधा-उद्धव ठाकरे
Just Now!
X