11 July 2020

News Flash

उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर

सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदूुत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवसपूर्ती होत असून त्यानिमित्ताने शिवसेना अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची कोंडी होत आहे. निवडणुका झाल्यावर अयोध्येला जाण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होते. सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदूुत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली होती.

ठाकरे अयोध्येला कधी जाणार, ते तारीख जाहीर करीत नाहीत, अशी विचारणा भाजप नेते करीत होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचे जाहीर केले आहे. ते सात मार्चला दुपारी अयोध्येत श्रीरामांचे दर्शन घेतील व सायंकाळी शरयूतीरी आरती करतील, असे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नेते व अनेक कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 1:35 am

Web Title: uddhav thackeray visits ayodhya on march 7 abn 97
Next Stories
1 उद्धव ठाकरे यांची कसोटी
2 मुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा
3 दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता..
Just Now!
X