28 November 2020

News Flash

करोनाकाळातील आहारसूत्राबाबत आज ऋजुता दिवेकर यांच्याशी संवाद

सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर वाचकांच्या आहारविषयक शंकांचे निरसन

करोनाकाळात प्रत्येकाची आरोग्यदक्षता वाढली असली तरी आहाराबाबत नेमकेपणाचा अभाव आढळतो. त्यामुळेच ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’च्या नव्या पर्वात आज, सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर वाचकांच्या आहारविषयक शंकांचे निरसन करणार आहेत.

‘उत्तम आहार आणि व्यायाम हे निरोगी आयुष्याचे रहस्य’, हा चिरपरिचित सल्ला शालेय जीवनापासून आपल्या सर्वाच्या कानी पडतो. पण, तो आचरणात आणणे सर्वाना शक्य होतेच असे नाही. त्यामुळे आता करोनाकाळात आहार नेमका कसा असावा; काय खावे-प्यावे, काय टाळावे, आदी प्रश्नांबरोबरच आहारविषयक अधिक माहिती जाणून घेण्याची संधी वाचकांना या वेबसंवादात मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांत आहारतज्ज्ञ म्हणून ऋजुता दिवेकर यांचे नाव लोकप्रिय झाले. करिना कपूरपासून अनेक बॉलीवूड कलाकार दिवेकर यांचे आहारसल्ले पाळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा दिवेकर यांच्या तंदुरुस्तीसूत्राचे कौतुक केले. भात-आमटी, पोळी-भाजी या चौरस आहाराचे महत्त्व त्या कायमच पटवून देतात. हळद-दूध, साजूक तुपापासून ते पोहे, उपम्यापर्यंत पारंपरिक पदार्थाचे आहारातील महत्त्व त्या नेहमीच सांगतात. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करा, पण त्या प्रयत्नांत आपले आरोग्य हरवत नाही ना, याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी आपल्या अनेक पुस्तकांतून, व्याख्यानांतून दिलेला आहे. आज करोनाकाळातील आहारसूत्राचा उलगडा त्या करतील.

शंकानिरसनाची संधी

करोनाकाळात आहार कसा असावा, घरातच असताना, बाहेर जाण्याची फारशी संधी नसतानाही व्यायाम कसा करावा, चरबी वाढणार नाही याची काळजी कशी घ्यावी, अशा अनेकविध शंकांचे निरसन करून घेण्याची संधी या वेबसंवादात वाचकांना मिळेल.

सहभागासाठी  https://tiny.cc/LS_Aarogyamaanbhav_23Nov  येथे नोंदणी आवश्यक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:28 am

Web Title: ujuta divekar in loksatta arogyamanbhav today abn 97
Next Stories
1 अस्थायी कर्मचाऱ्यांचे आजपासून धरणे आंदोलन
2 अंतिम निवडीनंतर विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द
3 प्रश्नपत्रिकेत चुका,प्रवेश परीक्षा कक्षाची लाखोंची कमाई
Just Now!
X