02 March 2021

News Flash

अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित

असुरक्षित इमारती व कायद्यांचे उल्लंघन करुन केलेली बांधकामे यांना संरक्षण दिले जाणार नाही.

संग्रहित छायाचित्र

राज्य शासनाची मसुदा नियमावली जाहीर

राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या क्षेत्रातील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यातील तरतुदींना अनुसरून मसुदा नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांकडून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्याचा विचार करून त्यानंतर सरकार त्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामांचा विषय चर्चिला जात आहे. राज्यातील युती सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा यापूर्वीच धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

या संदर्भात आता नगरविकास विभागाने मसुदा नियमावली जाहीर केली आहे. नदी, कालवा, धरण, पूर रेषा, संरक्षण क्षेत्र, खाणी, वारसा वास्तू, कचराभूमी, पर्यावरणविषयक संवेदनशील क्षेत्रे, किनारा नियमन क्षेत्र, कांदळवन या परिसरातील बांधकामे नियमित केली जाणार नाहीत. असुरक्षित इमारती व कायद्यांचे उल्लंघन करुन केलेली बांधकामे यांना संरक्षण दिले जाणार नाही.

काही अटी व शर्तीच्या अधीन राहून, इनाम जमिनी व वर्ग दोनच्या जमिनींवर केलेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी विचारात घेतली जाणार आहेत. मात्र त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. खेळांची मैदाने, उद्याने, मोकळी जागा यांसाठी राखीव असलेल्या परंतु कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही आरक्षणे अन्यत्र स्थलांतरित केली असल्यास, त्यावरील बांधकामे नियमित केली जातील. रस्ते, मेट्रो, रेल्वे यासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील बांधकामेही तोच नियम लावून कायम करण्याचा विचार केला जाणार आहे. अधिमूल्य, विकास शुल्क, पायाभूत सुविधा अधिभार, आकारून ही बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:48 am

Web Title: unauthorized constructions issue maharashtra government
Next Stories
1 ‘काळ्या आई’च्या पुनर्भेटीची शेतकऱ्यांची ‘तप’श्चर्या पूर्ण!
2 पाणीपुरी कारखान्यांवर छापे
3 पावसाने जुलै महिन्याची सरासरी ओलांडली
Just Now!
X