कारकीर्दीच्या सुरुवातीचीच संधी टाळेबंदीने हिरावली

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : गेली एक-दोन दशके  मुंबईच्या कलाविश्वात कार्यरत असलेल्या अनुभवी कलाकारांना टाळेबंदीने स्थलांतर करण्यास भाग पाडले असताना कलाक्षेत्राच्या उंबरठय़ावर असणाऱ्या नवोदित कलाकारांच्या कारकीर्दीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. महाविद्यालयीन शिक्षण नुकतेच पूर्ण करून भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज झालेल्या नवोदित कलाकारांना कारकीर्दीतील सुरुवातीच्या संधींना मुकावे लागत आहे.

बऱ्याचदा गावाकडून आलेल्या कलाकारांना चित्र किं वा शिल्पकलेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी घरातून फारसे प्रोत्साहन नसते. अशावेळी भोवतालचे सर्व संकुचित दृष्टिकोन झुगारून मोठय़ा कष्टाने या क्षेत्रात उतरलेले कलाकार महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही कलेतून थोडेफार अर्थार्जन करतात; पण शिक्षण संपल्यानंतर मिळणारी पहिली संधी आपले आयुष्य बदलून टाके ल या आशेवर असणाऱ्या तरुण कलाकारांना टाळेबंदीने उंबरठय़ावरच अडवले आहे. कलादालने उघडतील, कलाप्रदर्शने, कलाकृतींची विक्री सुरू होईल तेव्हाच लोकांसमोर आपली कला सादर करण्याची आणि कलेला व्यवसाय बनवण्याची संधी नवोदितांना मिळणार आहे.

कोल्हापूरच्या कु मार मिसाळ याचे पदव्युत्तर शिक्षण टाळेबंदीच्या आरंभी संपले. त्यापूर्वी झालेल्या महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनाच्या आधारावर ४ कलादालनांनी

कु मारची निवड चित्रप्रदर्शनासाठी के ली होती; मात्र टाळेबंदीमुळे ही प्रदर्शने झाली नाहीत. अन्य एका कलादालनाने त्याच्या चित्रांचे आभासी प्रदर्शन भरवले असता कमी किं मतीत कलाकृती विकाव्या लागल्या. विरारच्या पल्लवी जेठे हिने पदविका शिक्षण नुकतेच पूर्ण के ले आहे. कला अभ्यासक्रमांत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची विविध महाविद्यालयांतून निवड करून त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात भरवले जाते. टाळेबंदीत हे प्रदर्शन होऊ न शकल्याने खूप मोठी संधी हुकल्याची खंत पल्लवीने व्यक्त के ली.

टाळेबंदीमुळे पल्लवीच्या आईची आणि बहिणीची नोकरी गेली. त्यामुळे तिने ओळखीतील काहींना आपल्या कलाकृती पाठवून त्यांची विक्री के ली; पण भिंतींवर चित्रे काढण्याची कामे मिळणे बंद झाले आहे. जालन्याच्या विनायक गुडा याने कला अध्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण के ला. त्यानंतर आर्थिक चणचणीमुळे त्याला पदवीला प्रवेश घेता आला नाही. मित्रांसोबत एखादे प्रदर्शन स्वत:च आयोजित करण्याचा त्याचा विचार पैशांअभावी मागे पडला. कलाशिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणारा विनायक एके दिवशी ४० ते ४५ कि.मी.चा प्रवास करून एका शाळेच्या भिंती रंगवून आला. भविष्यात जाहिरात, अ‍ॅनिमेशन इत्यादी डिजिटल कलाकृतींचे महत्त्व वाढून चित्रे, शिल्पे यांसारख्या प्रत्यक्ष कलाकृतींचे महत्त्व कमी होण्याची भीती प्रशांत कु वर याने व्यक्त के ली.