News Flash

प्रवेश परीक्षांबाबत अद्यापही अस्पष्टता

विद्यार्थी अस्वस्थ; तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

विद्यार्थी अस्वस्थ; तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

मुंबई : दहावी, बारावीसह राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कधी, कशा होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्यामुळे विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

दहावी, बारावीसह अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील प्रवेश परीक्षांची वेळापत्रके दरवर्षी साधारणपणे डिसेंबपर्यंत जाहीर होतात. यंदा अद्यापही कोणत्याही परीक्षांबाबत स्पष्टता नाही.

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या राज्यमंडळाच्या परीक्षा यंदा मे-जूनमध्ये घेण्याच्या दृष्टीने राज्यमंडळाची चाचपणी सुरू आहे. आयआयटीसह विविध राष्ट्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील सामायिक परीक्षा (जेईई) दोन वेळा घेण्यात येते. त्यातील पहिली परीक्षा जानेवारीत होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षा मे महिन्यात होते. या परीक्षा होणार का, पुढे ढकलण्यात येणार का, याबाबतही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा कक्षाने अद्याप काहीही जाहीर केलेले नाही. राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या यंदाच्या तुकडीची प्रवेश प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षानेही पुढील परीक्षांबाबत निर्णय जाहीर केलेला नाही.

म्हणणे काय?

प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या की त्यानुसार विद्यार्थी त्यांचे नियोजन करतात. अनेक विद्यार्थी एकापेक्षा अधिक परीक्षा देतात. त्यामुळे कोणती परीक्षा कधी होणार आहे याचे नियोजन विद्यार्थी करतात. ‘शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या प्रत्यक्ष सुरू झाल्या नसल्या तरी विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात राहून अभ्यास करत आहेत. ऑनलाइन वर्गही सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा कधी होणार याची ढोबळ रूपरेखा तरी राष्ट्रीय आणि राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षाने आता जाहीर करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थी नियोजन करू शकतील. ‘सध्या आम्ही नियमित वेळापत्रकापेक्षा एखाद्या महिन्याचा फरक ग्राह्य़ धरून विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहोत. मात्र सर्वच अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांवरील ताण आता वाढत चालला आहे,’ असे एका खासगी शिकवणीच्या संचालकांनी सांगितले.

१० डिसेंबरला संवाद..

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) आणि विविध प्रवेश परीक्षा कधी आणि कशा होणार, त्यात काय बदल हवेत, अशा विविध मुद्दय़ांवर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून १० डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. ट्विटरवर विद्यार्थी त्यांचे प्रश्न उपस्थित करू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:00 am

Web Title: uncertainty over entrance exams for various courses at the state level zws 70
Next Stories
1 दामोदर तांडेल यांचे निधन
2 तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले -परब
3 हजार हेक्टर कांदळवन आता राखीव वन
Just Now!
X