16 October 2019

News Flash

धारावीत इमारतीचा भाग कोसळला, रिक्षा चालकाचा मृत्यू, तीन जखमी

मुंबईत धारावी परिसरात रविवारी रात्री बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळला.

मुंबईत धारावी परिसरात रविवारी रात्री बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. धारावीच्या पीएमजीपी कॉलनीमध्ये रात्री १०.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची माहिती आहे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा पाईप खालून जात असलेल्या रिक्षावर कोसळला. यामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी तिथून बाईकवरुन जाणारी एक व्यक्ती सुद्धा या दुर्घटनेत जखमी झाली. त्यांना आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असे पीएमजीपी कॉलनीचे रहिवाशी नईम कुरेशी यांनी सांगितले.

First Published on April 15, 2019 8:39 am

Web Title: under construction building collapsed in dharavi