News Flash

गोरेगावमध्ये निर्माणाधीन दुमजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू; 7 जखमी

घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल झालं असून बचावकार्य सुरू

मुंबईतील गोरेगाव येथे बांधकाम सुरू असलेली दुमजली इमारत कोसळल्याचं वृत्त आहे. यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झालेत.

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरमध्ये म्हाडा वसाहतीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तात्काळ सिद्धार्थ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. मृतांपैकी एकाचं नाव रामू असं असून तो 22 वर्षांचा होता, तो बांधकाम मजूर असल्याचं सांगितलं जातंय. घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. तर इतर सात जण जखमी आहेत. मंगल बनसा(35 वर्षं), मुन्ना शेख(30 वर्षं), शिनू (35 वर्षं), हरी वडार (3 वर्षं), शंकर पटेल(21 वर्षं), सरोजा वडार(24 वर्षं), रमेश निशाद (32 वर्षं) जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 11:32 am

Web Title: under construction building in goregaon collapse
Next Stories
1 मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
2 शासकीय डॉक्टरांच्या दुकानदारीला चाप!
3 राफेलप्रकरणी राहुल गांधींचा खोटारडेपणा उघड
Just Now!
X