News Flash

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत

पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

प्रतीकात्मक छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी २४ वर्षीय महिलेला बुधवारी अटक केली. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

आरोपी महिला ओशिवरा परिसरात एका शॉपिंग सेंटरमध्ये कामाला असून तिला तीन वर्षांंचे मुल आहे. तर पीडित मुलगा १६ वर्षांंचा आहे. ती सप्टेंबरपासून या  मुलाच्या घरी भाडय़ाने राहत होती. नोव्हेंबरच्या सुरवातीला तिने त्यांची खोली सोडली. यादरम्यान सुमारे चार ते पाच वेळा या महिलेने मुलाचे लैंगिक शोषण केले. याबाबत मुलाच्या आईला त्याच्या मित्रांकडून माहिती मिळाली. त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र तक्रार दाखल केल्याचे समजताच ही महिला मालाड येथील राहत्या घरातून फरार झाली. याबाबत तांत्रिक तपासाच्या साहाय्याने गोरेगाव पोलिसांनी तिचा थांगपत्ता शोधून काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपींविरोधात  पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 1:25 am

Web Title: underage boy sexual abuse case woman arrested dd70
Next Stories
1 पालिका मुख्यालयात भाजपचे आंदोलन
2 पाण्यासाठी ७००, तर शौचालयासाठी २७० रुपये
3 नुकसानीच्या अभ्यासासाठी एक कोटी ८० लाखांचा खर्च?
Just Now!
X