News Flash

बेरोजगारांच्या संस्था भ्रष्टाचाराचे कुरण! – वळसे पाटील

सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून जो फेडरेशनला पैसे देतो त्यालाच काम मिळते. सुशिक्षित बेरोजगारांना नव्हे तर कंत्राटदारांनाच कामे मिळत

| March 14, 2013 05:33 am

सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून जो फेडरेशनला पैसे देतो त्यालाच काम मिळते. सुशिक्षित बेरोजगारांना नव्हे तर कंत्राटदारांनाच कामे मिळत असून सरकारी निधी विनाकारण वाया घालविला जात आहे. राज्य सरकारला हे सर्व माहीत असूनही त्यावर कारवाई होत नसल्याचे खडे बोल विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी सरकारला सुनावले.
 ठाणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामाबाबत विवेक पंडित यांनी विचारलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान विधानसभा अध्यक्षांनी सरकारलाच धारेवर धरले. त्यावर सुशिक्षित बरोजगारांच्या सेवा संस्थाना द्यावयाच्या कामाबाबतचे र्सवकष धोरण लवकरच आणू अशी ग्वाही रोजगार व स्वयंरोजगार राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली.
या प्रश्नावरील चर्चेत हस्तक्षेप करताना सुशिक्षित बरोजगारांच्या सेवा संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून त्याबाबत विधानमंडळाच्या सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. त्याचे काय झाले अशी विचारणा विधानसभा अध्यक्षांनी केली. त्यावर या समितीच्या काही बैठका झाल्या असून संबंधित विभागांशी चर्चा सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या सोसायटय़ांना बोगस पद्धतीने कामे वाटली जात असून  फेडरेशनाला जो पैसे देतो, त्यालाच कामे दिली जातात. मनमानी पद्धतीने कामे करून आमदार निधीचाही पैसा हडप केला जात आहे. त्यातून सरकारी निधीचा अपव्यय होत असून याबाबत सरकारने ठोस उपाययोजना करावी, असे निर्देशही वळसे पाटील यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 5:33 am

Web Title: unemployed persons institutions are bribe takers valse patil
टॅग : Bribe
Next Stories
1 आणखी एक १५ डब्याची गाडी
2 अमराठी नगरसेवकांचा मराठीचा वर्ग भरलाच नाही
3 एसटी चालकांच्या गणवेशात बदल
Just Now!
X