भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय संसदीयमंत्री स्व. अनंत कुमार यांचे दिनांक 12 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 59व्या वर्षी कर्करोगाने अकाली निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात अनंतकुमार यांचा अस्थिकलशाचे बुधवार  दि. 21 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी आगमन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहून अस्थिकलश दर्शन घेण्यात आले.

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, 1996च्या 11 व्या लोकसभेपासून 16 व्या लोकसभेपर्यंत सहा वेळा सलग खासदार म्हणून अनंतकुमार बेंगळूरू दक्षिण येथून लोकसभेवर निवडून गेले होते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये संसदीय कार्य मंत्री म्हणून कार्यरत होते. आपल्या मृदू आणि कार्यतत्पर स्वभावामुळे त्यांनी मोठा जनसमुदाय जमवला होता. सतत लोकांचा विचार करणाऱ्या व संघटनेच्या कार्याला वाहून घेतलेला जननेता म्हणून त्यांची ओळख होती.

या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आ. रामदास आंबटकर आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.