वाहतूक पोलीसांची कारवाई

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त मोहिमेत पहिल्याच दिवशी १४८ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. मुंबईतील नऊ ठिकाणी झालेल्या या कारवाईत दक्षिण मुंबईतील कुलाबा, आझाद मैदान आणि काळबादेवी या तीन भागांत १००हून अधिक वाहनचालकांचे परवाने रद्द झाले.

. बुधवारपासून सुरू झालेल्या या कारवाईच्या पहिल्याच दिवशी नऊ ठिकाणी मिळून ५३४ वाहनचालकांवर विविध नियम मोडल्यामुळे कारवाई झाली. यात सिग्नल तोडल्याने १२३ वाहनचालकांना दंड भरावा लागला. तर हेल्मेट न घालणाऱ्या २५९ दुचाकीस्वारांवर कारवाई झाली. त्याशिवाय विविध नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णयही रावते यांनी घेतला होता. या निर्णयानुसार १४८ जणांचे परवाने रद्द करण्यात आले. रद्द झालेल्या परवान्यांत सर्वाधिक म्हणजे ४३ परवाने आझाद मैदान पोलीस चौकीच्या अधिकार क्षेत्रात रद्द झाले. त्या खालोखाल कुलाबा पोलीस चौकीअंतर्गत ३२ जणांवर ही कारवाई करण्यात आली. तर काळबादेवी चौकीअंतर्गत २७ आणि मालाड येथील हायपर सिटी मॉलजवळील कारवाईत २६ जणांचे परवाने रद्द झाले.

येत्या काही दिवसांत या कारवाईची व्याप्ती वाढेल, असे आयुक्त सोनिया सेठी यांनी केले आहे.