गेल्या अनेक दिवसांपासून चच्रेचा विषय ठरलेली मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्जावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्षेप घेतला होता. यानंतर हे प्रकरण विधी सल्लागारांकडे पाठविण्यात आले होते. यावर बुधवारी विधी सल्लागारांनी निर्णय देताना आक्षेप फेटाळून लावत सर्व चार अर्ज मंजूर करण्याचे विद्यापीठाला सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कॉन्सिलच्या अध्यक्ष आणि सचिव पदासाठी येत्या १५ जानेवारीला निवडणुक होत आहे. अर्ज छाननीच्यावेळी मनविसेकडून तीन गोष्टींवर आक्षेप घेण्यात आले होते यावर सल्लागारांकडून सल्ला मागण्यात आला होता. त्यांच्या सल्लय़ानुसार सर्व अर्ज मंजूर करण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ. मृदल निळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.