पैकीच्या पैकी गुणांमुळे विद्यापीठ यंत्रणा गोंधळात निकालपत्रात संकेतचिन्हे
मुंबई : विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळू शकतात, ही अकल्पित वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात उतरल्यामुळे आता विद्यापीठाचीच यंत्रणा गोंधळली आहे. विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या विषयांसमोर गुणांच्या जागी संकेतचिन्ह छापली गेली आहेत. गोंधळ समोर आल्यानंतर विद्यापीठाने गुणपत्रिका परत मागवल्या आहेत.
यंदा विद्यापीठाच्या सर्वच परीक्षांचे निकाल अनपेक्षितरीत्या वाढले. महाविद्यालयाच्या स्तरावर बहुपर्यायी स्वरूपात ऑनलाइन माध्यमातून परीक्षा झाल्या. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी कठीण वाटणाऱ्या विषयांमध्येही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. विधि अभ्यासक्रमाच्या शेकडो विद्यार्थ्यांना अनेक विषयांमध्ये शंभर गुण मिळाले. वाढलेल्या निकालाचा विद्यार्थ्यांना वाटणारा आनंद मात्र गुणपत्रिका हातात आल्यानंतर ओसरला आहे. शंभर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत गुणांच्या जागी संकेतचिन्ह उमटले आहे. विद्यापीठाच्या यंत्रणेलाही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे अनपेक्षित असल्यामुळे गुणपत्रिकांच्या छपाईत तांत्रिक गोंधळ झाल्याचे समजते आहे.
गुणपत्रिकेत गुण नमूद करण्याच्या रकान्यात दोन अंकीच संख्या अपेक्षित असताना तीन अंकी संख्या नमूद झाल्यामुळे गोंधळ झाला. शंभर गुण मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत गोंधळ झाला आहे, त्यांना महाविद्यालयाकडे गुणपत्रिका जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे.
विशेष दखल
बेस्ट प्रशासनाने करोनाविरोधातील लढय़ासाठी उभारलेल्या कक्षाची या लेखात विशेष दखल घेण्यात आली असून करोनाविरोधातील लढाईतील ही वैशिष्टय़पूर्ण कामगिरी असल्याचे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना उपचाराकरिता रुग्णालयात खाट उपलब्ध होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला आहे. करोनाकाळात सेवा देताना बेस्टच्या २८३३ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. त्यातील २६८७ कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५२ कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 5, 2020 2:39 am