01 October 2020

News Flash

प्रस्ताव मंजुरीसाठी कंत्राटदाराची सभागृहाबाहेर टेहळणी

गेल्या दोन बैठकांच्या वेळी पालिका सभागृहाबाहेर एक अज्ञात व्यक्ती टेहळणी करीत असल्याची बाब सोमवारी उघडकीस आली.

| July 7, 2015 02:17 am

गेल्या दोन बैठकांच्या वेळी पालिका सभागृहाबाहेर एक अज्ञात व्यक्ती टेहळणी करीत असल्याची बाब सोमवारी उघडकीस आली. सुरक्षारक्षकांनी हटकल्यानंतर आपण सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या जवळची व्यक्ती असल्याची बतावणी करीत या व्यक्तीने पळ काढला. मात्र या प्रकारामुळे सभागृहाच्या बैठकीच्या वेळी पालिका मुख्यालयात ठेवण्यात येणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या कडेकोट बंदोबस्ताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच त्यांनी या व्यक्तीची विचारपूस करण्याची सूचना तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना केली. दरम्यान, सभागृहात सोमवारी काही प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार होती. त्यामध्ये अंधेरी येथील एका रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावाचा समावेश होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळते का यासाठी ही व्यक्ती टेहळणी करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 2:17 am

Web Title: unknown person wonder outside of bmc house
टॅग Bmc
Next Stories
1 गोवंडी पोलीस ठाण्यात चुकून गोळीबार
2 अग्निशमन दल प्रमुखपदी रहांगदळे
3 चार वर्षांच्या मुलासह महिलेची आत्महत्या
Just Now!
X