25 February 2021

News Flash

यादीबाह्य लाभार्थीना लसीकरणासाठी पाचारण

दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

(संग्रहित छायाचित्र)

करोना लसीकरण मोहिमेसाठी मुंबई महापालिकेने आखलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५० टक्केच लसीकरण होत असल्याने पालिकेने आता ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोविन अ‍ॅपमध्ये सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीच नावे येत असल्याने पालिकेने आता अन्य विभागांचे तसेच खासगी आरोग्य कर्मचारी यांना पाचारण करण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कमर्चाऱ्यांचे लसीकरण कोविन अ‍ॅपच्या माध्यमातून होत आहे. अ‍ॅपमधून प्रत्येक केंद्रावर लाभार्थ्यांंची यादी उपलब्ध केली असली तरी यात लसीकरण केंद्र असलेल्या विभागातील आरोग्य कमर्चाऱ्यांची नावेच येत आहेत. शहरातील प्रत्येक विभागात केंद्र आहे असे नाही. एकीकडे लाभार्थ्यांंच्या यादीतील सर्वच आरोग्य कर्मचारी येत नाहीत आणि दुसरीकडे या विभागाव्यतिरिक्त इतर विभागातील लाभार्थी लसीकरणासाठी इच्छुक असूनही त्यांना येता नाही अशी स्थिती आहे. यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून आता पालिके ने दरदिवशीच्या यादीत इतर लाभार्थ्यांची नावे जोडण्याचा पर्याय अवलंबला आहे.

शनिवारी आणि मंगळवारी दोन्ही दिवशी मुंबईत उद्दिष्टाच्या ५० टक्के लसीकरण झाले. तेव्हा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता पालिकेने नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे विभागनिहाय व्हॉटसअप गट तयार केले आहेत. त्यानुसार इतर विभागातील लस घेण्यास इच्छुक असणाऱ्यांची नावे घेऊन जवळील लसीकरण केंद्रावरील यादीत दररोज जोडण्याचे आदेश पालिकेने विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. ‘आमच्या विभागातील लसीकरण केंद्रावर ४०० लाभार्थ्यांंची यादी दिली असली तरी यातील ५० टक्केच उपस्थित राहत आहेत. त्यामुळे आता जवळच्या विभागातील खासगी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांची नावे यादीत बुधवारपासून जोडली असून हे लाभार्थी लसीकरणासाठी येत आहेत,’ असे विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

अ‍ॅपमधील यादीच्या त्रुटी केंद्रीय आणि राज्यस्तरीय लसीकरण विभागाला कळविल्या असून यात लवकरच सुधारणा होईल असे सांगितले असल्याची माहिती पालिकेच्या कायर्म्कारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी दिली.

डोस घेतलेल्यांची नावे पुन्हा यादीत

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी पारंपरिक पद्धतीने लसीकरण झाले. त्यादिवशी लस घेतलेल्यांची नोंद अ‍ॅपमध्ये झालेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांंची नावे मंगळवारी आणि बुधवारच्या लसीकरण यादीत आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 12:05 am

Web Title: unlisted beneficiaries are called for vaccination abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 विसरभोळय़ा लोकलप्रवाशांची ‘धावाधाव’!
2 सराईत आरोपींवर ऑनलाइन निगराणी
3 पाच सायबर पोलीस ठाण्यांसाठी जागा निश्चित
Just Now!
X