बहुरंगी, अवलिया व्यक्तिमत्त्वाच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेषांक 

स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात दैवताचे स्थान मिळवलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या अप्रकाशित साहित्याचा एक खास विशेषांक ‘लोकसत्ता’तर्फे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सुमारे पाच दशके साहित्य, रंगभूमी, चित्रपट, काव्यवाचन, संगीत अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी केलेल्या पुलंचे साहित्य आजच्या वाचकांनाही टवटवीत वाटते आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आवृत्त्या आजही नव्याने निघत आहेत. त्यामुळेच आजवर त्यांच्या कोणत्याच ग्रंथात समाविष्ट न झालेले त्यांचे लेखन या विशेषांकाच्या निमित्ताने मराठी वाचकांसमोर प्रथमच येणार आहे.

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

पुलंनी इतक्या विविध विषयांवर भाषणे दिली आहेत, की त्यांचे विषय पाहिले तरी त्यांची अभ्यासू वृत्ती सहज लक्षात येऊ शकते. मग ते भाषण साने गुरुजींवरचे असो, की बालगंधर्वावरील. मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांची खास शैलीत सांगितलेली वैशिष्टय़े किंवा एखाद्या भावलेल्या चित्रपटाच्या निमित्ताने केलेले भाष्य. या भाषणांमध्ये पुलंच्या रसिकतेचा आणि व्यासंगाचा परिसस्पर्श झालेला दिसतो. आयुष्यभर त्यांनी केलेला पत्रव्यवहार हा एक फार मोठा वैचारिक साठा आहे. अगदी पोस्टकार्डवरील छोटय़ाशा पत्रातही पुलं एखादा नवा विचार मांडतातच. काही विशिष्ट कारणांनी आपला जीवनविषय भूमिका स्पष्ट करणारी दीर्घ पत्रे हाही पुलंच्या अप्रकाशित साहित्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. मित्रांना पाठवलेली आणि त्यांनी अतिशय प्रेमपूर्वक पाठवलेली ही पत्रे म्हणजे एक अपूर्व खजिना आहे. या विशेषांकात अशा निवडक पत्रांचा समावेश असणार आहे.

पुलंना त्यांच्या साहित्यिक सुहृदांकडून आलेली पत्रे हाही असाच मैत्रीचा अपूर्व नमुना आहे. विविध कारणांनी, प्रसिद्धीसाठी नसले, तरीही पुलंनी खूपच वेगळय़ा प्रकारचे लेखनही केले आहे. कधी ते रोजनिशीच्या रूपात सापडते, तर कधी स्वगताच्या. हे सारे साहित्य पुलंच्या पत्नी सुनीताबाई यांनी जिवापाड जपले. पुलंच्या निधनानंतर त्यातील काही अप्रकाशित साहित्याची पुस्तकेही प्रकाशित झाली. तरीही आयुष्यभर शब्दखेळ करणाऱ्या या अवलिया साहित्यिक कलावंताचे हे साहित्य त्यांचे मानसपुत्र डॉ. दिनेश आणि त्यांच्या पत्नी ज्योती यांनी त्याच ममत्वाने जपले. त्या दोघांनीही हे साहित्य ‘लोकसत्ता’साठी उपलब्ध करून दिले आहे.

‘लोकसत्ता’तर्फे लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या या खास अंकात त्यातील काही निवडक लेखांचा आणि विशेष छायाचित्रांचाही समावेश असेल. आताच्या पिढीलाही संग्राहय़ वाटेल, अशा या विशेषांकाचे तपशीलही लवकरच जाहीर करण्यात येतील.

‘‘संध्याकाळी एक रिक्षावाला पकडला आणि पाटण्याच्या गंगा किनाऱ्यावर जाऊन आलो. अलाहाबाद- बनारसचा गंगातीर पाहिल्यानंतरदेखील पाटण्याच्या गंगातीराचे सौंदर्य कमालीचे विलोभनीय वाटले. गंगेचे पात्र तर क्षितिजापर्यंत पोहोचले आहे. अगदी दूरवर असा पैलतीर दिसतो. संध्याकाळची वेळ होती. शांतिदेवतेचे स्वरूप साकार झाल्याचा साक्षात्कार झाला. गुलाबी संध्येचे प्रतिबिंब गंगेच्या अंतरंगावर उमटले होते. क्षणभर वेडावून गेल्यासारखे झाले. असले सौंदर्य एकटय़ाने पाहण्यात केवळ हुरहुर तेवढी वाटते. सुनीता असती तर निदान तासभर तरी तेथून हललो नसतो.’’

– आगामी विशेषांकातील एका लेखातून