अवकाळी पावसाचे सत्र मे महिन्यातही सुरू राहिले असून मध्य महाराष्ट्र व विदर्भातून जाणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पुन्हा एकदा राज्याच्या विविध भागात पावसाच्या सरी येत आहेत. रविवारीही विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. त्याचवेळी मुंबईसह कोकणात आकाश निरभ्र झाले असून पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
देशाच्या उत्तर व ईशान्य भागात वादळी पावसाच्या सरी येण्याचे सत्र सुरूच आहे. त्याचवेळी भर उन्हाळ्यातही राज्यात अवकाळी
मध्य प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत गेलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे दक्षिण भागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आल्या. मराठवाडा व विदर्भासह कोकणातही गेले दोन दिवस पावसाच्या सरी आल्या होत्या. मे महिन्याच्या शेवटी येणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोकणात नवीन नसल्या तरी मे महिन्याच्या पूर्वाधातच आलेल्या या सरींमुळे  सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांची गडबड उडाली.